which-rudraksha-for-pitru-dosh

30  जानेवारी 2025

पितृदोषापासून मुक्ती मिळावी यासाठी कोणता रुद्राक्ष परिधान करावा?

Rudraksha

हिंदू धर्मात रुद्राक्षाचे विशेष महत्त्व मानले जाते. रुद्राक्ष भगवान शिवाच्या अश्रूंपासून उद्भवली अशी मान्यता आहे.

which-rudraksha-for-pitra-dosha

हिंदू धर्मानुसार, कुंडलीत पितृदोष असणाऱ्या व्यक्तीला लग्न आणि नोकरीसह अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. 

which-rudraksha-reduce-pitru-dosha

पितृ दोष दूर करण्यासाठी पितरांचं तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करण्याचे उपाय आहेत. पितृदोष दूर करण्यासाठी रूद्राक्षही प्रभावी ठरतो. 

ज्योतिषशास्त्रानुसार, पितृदोष दूर करण्यासाठी रुद्राक्ष प्रभावी मानलं गेलं आहे. पितृदोष दूर करण्यासाठी कोणतं रुद्राक्ष परिधान करावं ते जाणून घ्या. 

ज्योतिषशास्त्रानुासर, पितृदोष दूर करण्यासाठी दहामुखी  रुद्राक्ष घालावा. मान्यतेनुसार, दहामुखी रुद्राक्षामुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होतो. 

पितृदोष कमी करण्यासाठी पाच मुखी, सात मुखी, आठ मुखी आणि बारा मुखी रूद्राक्षही परिधान करू शकता. 

रुद्राक्ष नसेल तर नवग्रह रुद्राक्ष मालाही परिधान करू शकता. रुद्राक्ष माला परिधान केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते.