पूजा करण्यापूर्वी का केलं जातं आचमन? जाणून घ्या महत्त्व
पूजा सुरु करण्यापूर्वी आचमन केलं जातं. तुम्हाला भटजींनी पूजा करण्यापूर्वी असं सांगितलं असेलच. मान्यतेनुसार, असं न केल्यास पूजेचा पूर्ण फळ मिळत नाही.
आचमनच्या माध्यमातून शरीर आणि मन शुद्ध केलं जातं. तसेच पुढच्या धार्मिक कार्यासाठी तयार केलं जातं आणि मानसिक शांती मिळते.
पूजेची सुरुवात करण्यापूर्वी शुद्धीसठी मंत्रांसोबत जल ग्रहण करण्यास आचमन बोललं जातं. पवित्र जल प्राशन करून मन आणि हृदय शुद्ध केलं जातं.
आचमन प्रक्रियेत व्यक्ती एका विशेष पद्धतीने जल ग्रहण करतो. यामुळे शुद्धता आणि देवाप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा हेतू असतो.
हिंदू धर्मात आचमनाचे महत्त्व आहे. मनुस्मृती ग्रंथात आचमनाचे महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. आचमन केल्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने तोंडाला स्पर्श केल्याने अथर्ववेदाचे समाधान मिळते.
पूजेपूर्वी एका तांब्याच्या कळशात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घेतले जाते. त्यात तुळशीपत्र टाकलं जातं.
आचमन पळीने उजव्या हातात तीन वेळा पाणी घेऊन इष्टदेव, सर्व देव आणि नवग्रहांचं ध्यान केल जातं आणि ग्रहण केलं जातं. याला आचमन संबोधलं जातं.