25 डिसेंबर 2024

घरात लोबान जाळणं का शुभ मानलं जातं?

ज्योतिषशास्त्रानुसार, घरात लोबन लावणं चांगलं मानलं जातं. धार्मिक, वैज्ञानिक आणि मानसिक शांतीसाठी लोबान लावलं जातं. 

हिंदू धर्मशास्त्रानुसार, लोबान लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात. घरात सुख शांती आणि प्रसन्न वाटतं.

लोबान नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो, असं मानलं जातं.

लोबान जाळल्याने वास्तुदोष दूर होतो आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. 

लोबानमध्ये अँटिसेप्टिक गुण असतात. यामुळे हवा शुद्ध होते आणि घातक बॅक्टेरिया मरतात. 

लोबानचा सुगंध तणाव कमी करतो आणि मन शांतीसाठी मदत होते. घरात आनंदी वातावरण राहतं. 

लोबान धगधगत्या कोळश्यावर टाकून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. संध्याकाळी लोबान जाळणं प्रभावी मानलं जातं.