3 जानेवारी 2025

लग्नापूर्वी मनगटावर का बांधली जाते हळदीची गाठ?

हिंदू धर्मात सोळा संस्कार असून विवाह त्यापैकी एक आहे. यात खूप विधी केल्या जातात. जाणून घ्या विधीबाबत

हिंदू धर्मात लग्नापूर्वी मुलीच्या मनगटावर हळदीची गाठ बांधली जाते. या प्रथेत पवित्र आणि शुभ संकेत असतात. 

हिंदू धर्मात हळद पवित्र मानली जाते. यामुळे पूजेत हळदीचा वापर केला जातो.

विवाहादरम्यान वधूवराच्या शरीराला हळद लावली जाते. तसेच घरात प्रवेश करताना हळदीचे छापे लावले जातात. 

लग्नापूर्वी वधूच्या हाताला हळदीची गाठ बांधली जाते. यामुळे वधुची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून सुरक्षा होते. 

हळदी सुख समृद्धीचं प्रतीक मानली जाते. जेव्हा वधू पतीच्या घरी जाते. तेव्हा पती ती गाठ काढतो.