नव्या गाडीची पूजा करताना चाकाखाली लिंबू ठेवण्याचं कारण काय? जाणून घ्या
31 March 2025
Created By: राकेश ठाकुर
आपल्याकडे कोणतीही नवीन गोष्ट आणली की त्याची पूजा करतो. कारची अशीच पूजा केली जाते. पूजा करताना गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवला जातो. पण असं का?
घरात मुख्य द्वाराजवळ, दुकानाबाहेर किंवा कारला लिंबू मिरची एकत्र बांधली जाते. तशी एक प्रथा आहे.
गाडी विकत घेतल्यानंतर प्रत्येक जण त्याची पूजा करतो. तसेच टायरखाली लिंबू ठेवतात.
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, लिंबू शुक्र आणि चंद्राशी निगडीत आहे. आंबट चव शुक्र ग्रहाशी संबधित आहे. तर लिंबूतून निघणारा रस हा चंद्राशी संबंधित आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, नव्या वस्तूंच्या आसपास खूप नकारात्मक ऊर्जा असते. यासाठी नव्या कारच्या चाकाखाली लिंबू ठेवला जातो.
कोणाची वाईट नजर पडली असेल तर चाकाखाली लिंबू चिरडून ती दूर करण्याची प्रथा आहे. तसेच शुक्र आणि चंद्र ग्रह मजबूत होतो.
मान्यतेनुसार, लिंबू जवळ ठेवल्याने कोणाची वाईट नजर पडत नाही. अनेक लोक प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवतात.