21 नोव्हेबर 2024

कालभैरवाला काशीचा कोतवाल असं का म्हंटलं जातं?

Created By: राकेश ठाकुर

कालभैरवाला काशीचा कोतवाल संबोधण्यामागे काही पौराणिक कथा आहेत.

भगवान शिवाच्या उग्र रुपाला कालभैरव संबोधलं जातं. तसेच तंत्र देवता मानलं जातं. तंत्र मंत्र साधनेसाठी सर्वात आधी कालभैरवाची पूजा केली जाते. 

एका कथेनुसार, कालभैरव हे शिवाचे रुप असून अधर्म आणि पापाचा नाश करण्यासाठी प्रकट झाले आहेत.

ब्रह्मदेवाने शिवाचं अपमान केला होता. तेव्हा क्रोधित झालेल्या शिवाच्या तेजातून कालभैरवाची उत्पत्ति जाली. कालभैरवाने ब्रह्मदेवाचं अहंकाराचं पाचवं शिर कापलं.

कालभैरवावर ब्रह्महत्याचा दोष लागला होता. त्यातून मुक्तीसाठी तपस्या केली. तेव्हा भगवान शिवाने आशीर्वाद म्हणून काशीचे रक्षण करण्यास सांगितलं आहे. 

मान्यतेनुसार, काशीत प्रवेश करण्यापूर्वी कालभैरवाची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या पूजेशिवाय काशी यात्रा अर्धवट गणली जाते. 

कालभैरवाच्या पूजेने पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे. तसेच भक्तांना संकटातून वाचवते.