7 जानेवारी 2025

रात्री उष्टी भांडी का ठेवू नयेत? काय सांगतं ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात रात्री उष्टी भांडी ठेवणं अशुभ मानलं जातं. या मागचं कारण समजून घेऊयात. 

ज्योतिषशास्त्रानुसार, भांड्यांवर मंगळ ग्रहाचं अधिपत्य आहे. रात्री उष्टी भांडी ठेवल्याने मंगळ ग्रह खराब होतो. घरात भांडण तंटे वाढतात. 

चंद्र मन शांत ठेवतो आणि शनिदेव धीर आणि शिस्तीचा कारक आहे. रात्री उष्टी भांडी ठेवल्याने दोन्ही ग्रह नाराज होऊ शकतात. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं. 

ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री उष्टी भांडी सोडल्याने राहु केतुचा अशुभ प्रभाव वाढतो. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. 

नकारात्मक ऊर्जेचा संपूर्ण घरात संचार होतो. घरातील सदस्यांच्या आरोग्य आणि मानसिकतेवर परिणाम होतो. 

किचनमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. अस्वच्छतेमुळे देवी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते. आर्थिक नुकसान होऊ शकतं. 

उष्टी भांडी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. यामुळे रात्रीची उष्टी भांडी बेसिनमध्ये तशीच टाकून ठेवू नये.