27 नोव्हेबर 2024

घरातील देव्हाऱ्यात माचिस का ठेवू नये? काय सांगतं वास्तुशास्त्र

पूजाविधी करताना दिवा, धूपबत्ती किंवा अगरबत्ती लावली जाते. हे जाळण्यासाठी माचिसचा वापर केला जातो.

काही जण दिवा लावल्यानंतर माचिस देव्हाऱ्याच्या खणातच ठेवतात. पण देव्हाऱ्यात माचिस ठेवू नये, अशी मान्यता आहे. 

माचिस देव्हाऱ्यात न ठेवण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. 

वास्तुशास्त्रानुसार, देव्हाऱ्यात माचिस ठेवू नये. कारण माचिस ही नकारात्मकतेचे प्रतिक मानलं जातं. 

ज्योतिषानुसार, देव्हाऱ्यात माचिस ठेवल्याने फळ मिळत नाही. त्यामुळे देव्हाऱ्यात माचिस ठेवू नये. 

देव्हाऱ्यात माचिस ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते असं सांगितलं जातं. त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो. 

देव्हाऱ्याऐवजी माचिस किचन किंवा इतर ठिकाणी ठेवू शकता. इतकंच काय तर माचिसच्या काड्याही पेटवल्यानंतर तशाच टाकू नयेत.