सानिया मिर्झासोबत लग्नाच्या बातम्यांवर शमीने सोडलं मौन

20 July 2024

Created By : Manasi Mande

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व टेनिसपटू सानिया मिर्झा लग्न करणार असल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून फिरत आहेत.

दोन्ही स्टार्सचे बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अखेर मोहम्मद शमीने यावर प्रतिक्रिया देत मौन सोडले.

या अफवांबद्दल विचारल्यावर ऑनलाइन अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर शमी चांगलाच भडकला.

सोशल मीडियावर अशा खोट्या बातम्या पसरवू नका. अशा मीम्समुळे लोकांचं मनोरंजन होत असलं तरी काहींना त्रास होतो.

लोकांनी विचारपूर्वक मीम्स बनवले पाहिजेत. अशा शेंडाबुडखा नसलेल्या बातम्या पसरवू नका, असे आवाहन शमीने केले.

हे खूप अजब आहे. फोन उघडला की तुम्हाला तुमचाच फोटो तिथे दिसतो, अशा वेळी काय कराल ?

मला एकचं सांगायचंय की असं कोणीही करू नये. तुमच्यात दम असेल तर व्हेरिफाईड पेजवरून असं बोलून दाखवा, असं आव्हानही शमीने दिलं.