टेनिस स्टार नोवाक जोकोविचने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचे सगळेच फॅन्स हैराण झालेत. क्रीडा विश्व या बातमीने हादरुन गेलय. Credit : Getty, AP, Social Media 

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

वादग्रस्त वीजा प्रकरणादरम्यान जानेवारी 2022 मध्ये मेलबर्नमध्ये ताब्यात  असताना जेवणातून विष दिलं होतं,  असं जोकोविच म्हणाला.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

ऑस्ट्रेलियन ओपन 2022 च्या आधी ट्रॅव्हल डॉक्युमेंटमध्ये चुकीची माहिती दिल्याची कबुली दिल्यानंतर जोकोविचला ताब्यात घेतलं होतं.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

त्यावेळी वीजा रद्द झाल्यानंतर जोकोविचला ऑस्ट्रेलियातून डिपोर्ट करण्यात आलं होतं. कायदेशीर कारवाई दरम्यान त्याला मेलबर्नच्या एका हॉटेलमध्ये रहावं लागलं होतं.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

जोकोविचने GQ शी बोलताना सांगितलं की, मला काही हेल्थ इश्यू होते. मला जाणीव झालेली की, मेलबर्नच्या त्या हॉटेलमध्ये मला असं जेवणं देण्यात आलं की, त्यामुळे माझ्या शरीरात विष तयार झालं. माझ्या जेवणात विष होतं.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

त्यावेळी तापासारखी लक्षण दिसलेली.  सतत तब्येत बिघडल्यानंतर पुढे आरोग्य  तपासणी करण्यात आली.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

24 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या जोकोविचने सांगितलं की, सर्बियामध्ये परतल्यानंतर टॉक्सिकलॉजी टेस्ट केली.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

त्यावेळी त्याच्या शरीरात सीसा आणि पारासह अन्य धातुंचा स्तर चिंताजनक पातळीवर होता.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab