Virat Kohli : विराट कोहलीला आवडतं हे पिवळं फळ, त्याचे फायदे काय?
5 November 2024
Created By : Manasi Mande
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा आज 36 वा वाढदिवस, तो सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्याची एनर्जी (Photos : Social Media / Getty Image)
डाएट आणि फिटनेसप्रती असलेल्या जागरूकतेमुळे त्याची एनर्जी उत्तम राहते. त्याच्यासारखा आहार घेऊन तुम्हीही एनर्जेटिक राहू शकता.
विराट अनकेदा मैदानातच केळं खाताना दिसतो. हे त्याचं आवडतं फळ आहे.पोटशिअम आणि फायबरयुक्त केळ्यामुळ शरीरात बराच वेळ एनर्जी राहते.
स्टॅमिना वाढवण्यासाठी केळं उत्तम, एक्सपर्टसच्या सांगण्यानुसार, त्यातील ब्रोमेलेन एंझाम हे टेस्टोस्टेरॉन बूस्ट करतं ज्यामुळे स्टॅमिना वाढतो.
नियमित केळं खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. कारण त्यात फायबर असतं.
स्टामिना आणि पोषक तत्वांसाठी मासेही खाऊ शकता. विराट कधीकधी सीफूड खातो पण सध्या तो वेगन डाएट फॉलो करतो.
पूर्वीच्या काळी ताकद वाढवण्यासाठी लोकं काळे चणे खायचे. त्यातील प्रोटीन आणि इतर तत्वांमुळे शरारीला खूप एनर्जी मिळते.