श्रीलंकेला आता आक्रमक कोचिंग मिळणार, या दिग्गज खेळाडूचं नाव प्रशिक्षकपदासाठी चर्चेत

8 July 2024

Created By: Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे.

झिम्बाब्वे मालिकेनंतर भारत श्रीलंका विरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका या महिन्याच्या शेवटी आहे. 

27 जुलैपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी टीम इंडिया नव्या कोचसह मैदानात उतरेल. तर श्रीलंकेला नवा कोच मिळाला आहे. 

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत निराशाजनक कामगिरीनंतर ख्रिस सिल्व्हरवूडने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. 

श्रीलंकन क्रिकेट बोर्डन ही जबाबदारी आता माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्याच्या खांद्यावर टाकली आहे. त्याच्याकडे ही जबाबदारी सप्टेंबरपर्यंत असेल. 

आयसीसीने अँटी करप्शन प्रकरणी जयसूर्यावर 2019 मध्ये दोन वर्षांची बंदी घातली होती. तपासात सहकार्य न करणे आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता.

जयसूर्याने श्रीलंकेसाठी 445 वनडे सामन्यात 13430 धावा केल्या आहेत. यात 28 शतकं आहेत. भारताविरुद्ध त्याने 2899 धावा आणि 7 शतकं केली आहेत.