सूर्यकुमार यादव सामन्यापूर्वी बॅटिंग प्रॅक्टिस करत नाही, कारण...

25 July 2024

Created By: राकेश ठाकुर

श्रीलंका दौऱ्यापासून टी20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा सुर्यकुमारच्या खांद्यावर देण्यात आली आहे. 

सूर्यकुमार यादवचा रोल बदलला असून आता सराव करणाऱ्या खेळाडूंवर नजर ठेवून आहे. 

सूर्यकुमार यादव पल्लेकेलेमध्ये सराव का करत नाही असा प्रश्न पडला आहे. मंगळवार आणि बुधवारी त्याने सराव केला नाही.

त्याचं कारण असं आहे की, सूर्यकुमार यादव सामन्यापूर्वी कधीच बॅटिंग प्रॅक्टिस करत नाही. असं तो गेल्या सहा वर्षांपासून करत आहे

सराव न करण्याचं काही खास कारण नाही. पण सामन्यापूर्वी तो स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. 

सामन्यापूर्वी सराव न केल्याने थोड्याफार प्रमाणात फायदाही होतो. सामन्यात फ्रेश राहतो आणि सकारात्मक विचार करण्यास मदत होते.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला टी20 सामना 27 जुलैला होणार आहे. या मालिकेपासून सूर्या-गंभीर जोडी पाहायला मिळणार आहे.