चालण्याची सवय असेल तर तुम्हाला Apple Watch मोफत मिळेल! जाणून घ्या ऑफर
तुम्ही दररोज 15000 पावलं चालत असाल तर तु्म्हाला Apple Watch Series 10 अगदी मोफत मिळेल. ही ऑफर एचडीएफसी इर्गो आणि झोपरसोबत आहे.
Apple Watch Series 10 खरेदी करा आणि एचडीएफसी इर्गो अॅपवर नोंदणी करा.. नंतर झोपर वेलनेस प्रोग्राममध्ये सामील व्हा. तसेच तुमची अॅक्टिव्हिटी ट्रॅक करा.
रोज 15000 पावलं चाला आणि प्वॉइंट्स मिळवला. पूर्ण वर्षभर हे केल्यानंतर Apple Watch Series 10 किंमत परत मिळेल.
तुमचे प्वॉइंट्स प्रत्येक महिन्यात गणले जातील. जर दिवसाला 15000 पावलं चालले नाहीत तरी 30 टक्क्यांपर्यंत पैसे परत मिळतील. रिफंडसाठी केव्हायसी आणि बँक अकाउंट लिंक करावं लागेल.
ही ऑफर एपल प्रिमियम रेसेलेर्स आणि ऑफलाईन स्टोर्सवर आहे. फ्लिपकार्ड आणि अमेझॉनवरून खरेदी केल्यास ऑफर मिळणार नाही.
रोज 15 हजार पावलं चालल्याने तुमची तब्येतही ठणठणीत राहील.
ही ऑफर तुमच्या फायद्याची आहे. रोज चाला आणि फिट राहा आणि Apple Watch Series 10 चं पूर्ण रिफंड मिळवा.