वनडेमध्ये सर्वात जास्त शतक ठोकणाऱ्या खेळाडूंची यादी
वनडे सामन्यांमध्ये सर्वात जास्त शतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे.
सचिन तेंडुलकरने 463 सामन्यांमध्ये 49 शतक केले आहेत.
सचिन तेंडुलकरनंतर या यादीत विराट कोहलीचा नंबर लागतो.
विराट कोहलीने केवळ 288 सामन्यांमध्ये 48 शतक केले आहेत. विराट सचिनचा रेकॉर्ड मोडू शकतो.
विशेष म्हणजे या यादीत तिसरा खेळाडूसु्द्धा भारताचाच आहे. हिटमॅन रोहित शर्माने 258 सामन्यांमध्ये 31 शतक केले आहेत.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगचा चौथा नंबर आहे. त्याने 375 सामन्यांमध्ये 30 शतक केले आहेत.
श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने 445 सामन्यांमध्ये 28 शतक केले आहेत.
हिरवी की लाल,कोणती मिरची जास्त खतरनाक ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा