राजापूरची गंगा जगातील एकमेव अनोखे आश्चर्य, सृष्टीचा चमत्कार की गूढ रहस्य?
10 December 2023
Created By : Mahesh Pawar
राजापूर तालुक्यात दर तीन वर्षांनी वडाच्या झाडाच्या बुंध्यातून मे महिन्यात आपोआप गंगा येते.
राजापूरची गंगा स्वतंत्र आहे. ती आपल्या इच्छेप्रमाणे येते आणि इच्छेप्रमाणे कधी जाईल याचा नेम नाही.
राजापुरची गंगामाई चे क्षेत्र लाल जांभ्या दगडात बांधलेलं आहे. येथे एकूण १४ कुंडे आहेत.
मुळ गंगा वटवृक्षाखाली उगम पावते आणि मग समोरच्या १४ कुंडात पाणी भरते.
त्यानंतर हे पाणी गोमुखातून बाहेर येते. तेथे सर्व भक्त स्नान करतात.
पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी ही कुंडे भरत नाही. प्रत्येक कुंडात पाण्याचे तापमान वेगळे असते.
गंगामाई प्रकट झाल्यापासून सकाळ संध्याकाळ पुजा, आरती, नैवैद्य सर्व विधी केले जातात.
गंगामाई परिसरात जत्रा भरते. लोकांची भरपुर गर्दी असते.
गंगामाईच्या आवारात जर काही चुकीचे झाले तर गंगामाई लगेच जाते असे बोलतात.
गंगामाईचे आगमन झाल्यानंतर शक्य झाल्यास एकदा तरी राजापूरच्या गंगेचे दर्शन घ्यावे.
हे सुद्धा वाचा | घरात नवीन सून आणताना या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.