पावसाळा सुरु झाला की, डोळे येण्याची साथ सुरु होते.

जिवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे कंजंक्टिव्हायटिस होतो.  ज्याचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस होते.

डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स किंवा सौंदर्यप्रसाधने वापरले की त्याचा प्रसार होतो.

डोळे स्वच्छ ठेवा. डोळ्यांना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.

डोळे आलेल्या व्यक्तीने लोकांच्या संपर्कात येताना काळा चष्मा वापरावा.

आपला रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स अथवा इतर वस्तू इतरांना वापरण्यास देऊ नयेत.

डॉक्टरांच्या सल्यानुसार वेळीच उपचार घ्यावेत.