रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचे प्राण्यांवर प्रेम सर्वांना माहीत आहे.
1 April 2025
Created By : Jitendra Zavar
अनंत अंबानी जामनगर ते द्वारका 140 किलोमीटर पदयात्रा करत आहे. या पदयात्रेदरम्यान त्यांनी असे काम केले त्याचे देशभर कौतूक होत आहे.
अनंत अंबानी यांनी त्यांच्या पदयात्रे दरम्यान कत्तलखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या वाचवल्या. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये ते प्रवासादरम्यान कोंबडीला घेऊन चालताना दिसत आहे. तसेच कोंबडीला गाडीत नेण्याबाबत ते बोलत होते.
सर्वांना वाचवा. सर्व कोंबड्या विकत घेऊन टाका. त्याचा मालकांना त्याचे पैसे देऊन टाका, असे ते कर्मचाऱ्यांना सांगत आहे. त्यानंतर त्यांनी त्या कोंबड्यांना वनतारामध्ये पाठवले.
या कोंबड्यांची काळजी घेणार असल्याचे अनंत अंबानी यांनी जाहीर केले. यावेळी अनंत अंबानी यांनी हातात कोंबडी धरून ‘जय द्वारकाधीश’चा नारा दिला.
जामनगर ते द्वारका पदयात्रेत अनंत अंबानी रोज 10-12 किलोमीटर प्रवास करत आहे. या दरम्यान रस्त्यात येत असलेल्या मोठ्या मंदिरांमध्ये जाऊन ते पूजाही करत आहेत.
अनंत अंबानी यांचा वाढदिवस या महिन्यात आहे. त्यासाठी त्यांनी जामनगर ते द्वारका पदयात्रा सुरु केली.