dolly chaiwala (3)

नागपुरातील असलेला डॉली चहावाला नेहमी सोशल मीडियामध्ये चर्चेत असतो. डॉली चहावाला सध्या दुबईत आहे.

20 March 2025

डॉली चहावाला कधी बिल गेट्स यांना चहा देताना दिसतो तर कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पोहचतो. 

dolly chaiwala (1)

डॉली चहावाला नेहमी नवीन काही करत असतो अन् नवीन काही दाखवत असतो. आता डॉली एका लग्झरी कारसोबत दिसत आहे.

dolly chaiwala (2)

डॉली चहावाला याने एका लग्झरी कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या कारचे नाव मॅकलॉरेन आहे. तिची किंमत चार कोटी रुपये आहे. 

डॉलीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, मॅकलॉरेन माझी फेवरेट, तुमची कोणती आहे? 

डॉली चहावाला याच्या या पोस्टवर अनेक युजरने लाईक केले आहे. अनेकांनी कॉमेंट केली आहे. एकाने तर म्हटले आम्हीसुद्धा चहा विकण्यास सुरुवात करतो. 

डॉली चहावाला सोशल मीडियावर मोठ मोठ्या लोकांसोबतचे त्याचे फोटो शेअर करत असतो. तो एक सोशल मीडिया सेंसेशन बनला आहे.