10 रुपयांच्या नाण्यातील पिवळ्या रंगाचा भाग कशापासून बनवला जातो?

17 March 2025

Created By: Swati Vemul

भारताच्या चलनात 10 रुपयांचं नाणं सगळ्यात वेगळं आहे, कारण त्यात दोन रंग आहेत

दहा रुपयांचं नाणं बनवण्यासाठी दोन प्रकारच्या धातूंचा वापर होतो

या नाण्यातील आतली बाजू इतर नाण्यांप्रमाणे असते, तर बाहेरच्या बाजूला पिवळ्या रंगाचं वर्तुळ असतं

10 रुपयांचं नाणं 7.71 ग्रॅमचं असतं, त्यामध्ये बाहेरील वर्तुळ 4.45 ग्रॅमचं आणि मधलं वर्तुळ 3.26 ग्रॅमचं असतं

या नाण्याच्या मध्यभागील वर्तुळ हे Cupro Nickel चं बनलेलं असतं

या मधल्या भागात 75 टक्के तांबे आणि 25 टक्के निकेल असतं

10 रुपयांच्या नाण्यातील बाहेरचं वर्तुळ एल्युमिनियम ब्राँझचं बनलेलं असतं

बाहेरील वर्तुळात 92 टक्के तांबे, 6 टक्के एल्युमिनियम आणि 2 टक्के निकेल असतं

"जुही बब्बरसोबत पतीच्या जवळीकीने आयुष्य उद्ध्वस्त केलं"