Created By: Shailesh Musale

जसजसा हिवाळा जवळ येतो तसतसे लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त होतात.

अशा वेळी सगळ्यात मोठा प्रश्न समोर येतो तो म्हणजे हिवाळ्यात केस गळती रोखण्यासाठी काय करावे?

केसांमध्ये आवळा आणि दही वापरल्याने केस मजबूत, चमकदार आणि दाट होतात.

आवळा केसांचे पोषणही करतो. आवळा केसांना लावल्याने केसांची वाढही वेगाने होते.

आवळा हेअर पॅक लावण्यासाठी प्रथम एक कप घ्या. त्यात तीन ते चार चमचे दही मिसळा.

त्यात मध आणि लिंबाचा रस घाला. घट्ट पेस्ट होईपर्यंत काही वेळ ते मिसळत राहा.

हा हेअर पॅक लावल्यानंतर डोक्यावर 30 ते 40 मिनिटे राहू द्या. त्यानंतर, आपले केस कोमट पाण्याने आणि सौम्य शैम्पूने धुवा.