हलगर्जीपणा टाळा, अन्यथा घेता येणार नाही EPFO च्या या सुविधांचा फायदा, जाणून घ्या

 22  नोव्हेंबर 2024

Created By: संजय पाटील

UAN एक्टीव्ह केलं नसेल तर, EPFO च्या सर्व सेवा बंद होऊ शकतात. ईपीएफओकडून सर्व पीएफधारकांना यूएएन एक्टीव्ह करण्याचं आवाहन

EPFO च्या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी यूएएन बंधनकारक, त्याशिवाय पासबूक डाऊनलोड करणं, रक्कम तपासणं आणि रक्कम काढणं यासारखे व्यवहार करणं अवघड होईल

ईपीएफओकडून सर्व पीएफधारकांना UAN आधारसह लिंक करण्याचं आवाहन, आधार ओटीपीद्वारे करता येणार लिंक

त्यानंतर फेस रिकग्निशनद्वारे UAN एक्टीव्ह होईल, ज्यामुळे पीएफधारकांना सर्व सुविधांचा लाभ घेता येईल

UAN म्हणजे  यूनिव्हर्सल अकाउंट नंबर, हा नंबर 12 अंकी असतो. हा अकाउंट नंबर पीएफधारकाच्या खात्यासह जोडला जातो, ज्यामुळे विविध सुविधांचा लाभ घेता येतो

UAN द्वारे पासबूक डाऊनलोड करता येतं, ज्यामुळे खात्यात तुमच्या कंपनीकडून किती रक्कम जमा करण्यात आली? हे समजतं

epfo वेबसाईटवर गेल्यावर activate uan यावर क्लिक करा, uan, आधार आणि इतर माहिती भरा, otp टाका, त्यानंतर uan एक्टीव्ह होईल आणि पासवर्ड मोबाईलवर येईल