19 नोव्हेबर 2024

सोन्याची ज्वेलरी की बिस्किट! काय खरेदी करणं ठरेल स्वस्त?

Created By: राकेश ठाकुर

लग्नाचा सिझन सुरु झाला आहे आणि या कालावधीत सोनं महाग होतं. पण सध्यातरी त्या तुलनेत स्वस्त आहे.

दिवाळीत सोन्याच्या किंमतीने रेकॉर्ड स्तर गाठला होता. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 79,690 रुपयांपर्यंत गेली होती.

दिवाळीनंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 19 ऑक्टोबरला 10 ग्रॅम सोन्याची किंमत 76,920 रुपयांपर्यंत आली आहे.

जर तु्म्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ही योग्य वेळ आहे. 

सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ज्वेलरी की बिस्किट चांगला पर्याय ठरेल, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?

सोन्याच्या ज्वेलरीवर 3 टक्के जीएसटी आणि 15 ते 20 टक्के मेकिंग चार्ज द्यावा लागतो.

पण सोन्याचं बिस्किटासाठी फक्त 3 टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे सोन्याचं बिस्किट स्वस्त पडतं.