PM Awas Yojana : असा करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
7 डिसेंबर 2024
केंद्र सरकारने 2015 साली सर्वसामांन्यांना घर खरेदीसाठी-बनवण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने पीएम आवास योजनेची सुरुवात केली
योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो, जाणून घेऊयात ऑनलाईन अर्ज कसा करायचा
पीएम आवास योजनेच्या pmaymis.gov.in या वेबसाईटवर जा
सिटीझन एसेसमेंट (Citizen Assessment) या टॅबवर क्लिक करा.त्यानंतर 3 पर्यायापैकी एक पर्याय निवडा
आधार कार्डवरील माहिती योग्य पद्धतीने भरा आणि 'चेक' वर क्लिक करा
त्यानंतर विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती अचूक भरा, त्यानंतर कॅप्चा टाका आणि सेव्ह वर क्लिक करा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार, पॅन, व्होटिंग कार्ड, इनकम प्रूफ (सॅलरी स्लिप) आणि बँक डिटेल्स देणं गरजेचं