22 नोव्हेबर 2024

Personal Loan Vs Gold Loan : कोणतं कर्ज ठरतं फायद्याचं? जाणून घ्या

Created By: राकेश ठाकुर

पैशांची गरज पडली तर पर्सनल किंवा गोल्ड लोन चांगला पर्याय ठरतो. पण दोन्ही कर्जाचे फायदा आणि तोटे वेगवेगळे आहेत. 

गोल्ड लोनवरील व्याजदर 9 ते 10 टक्के असतो. हा व्याजदर पर्सनल लोनपेक्षा कमी असतो. पर्सनल लोनचा व्याजदर 11 ते 18 टक्क्यांपर्यंत असतो.

गोल्ड लोनसाठी दागिने गहाण ठेवले जातात. तर पर्सनल लोन काहीही तारण न ठेवता मिळतं. यात सोन गहाळ होण्याचं टेन्शन नसतं. पण क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.

गोल्ड लोनसाठी दागिने तपासून लोन दिलं जातं. पण पर्सनल लोन हे इनकम, क्रेडिट स्कोअर आणि नोकरी पाहून दिलं जातं.

गोल्ड लोन दागिन्यांच्या किमतीवर जास्तीत जास्त 75 टक्क्यांपर्यंत दिलं जातं. पण पर्सनल लोन उत्पन्नावर आधारित मिळते. पण ईएमआय इनकमच्या 50 टक्क्याहून जास्त नसावा.

पर्सनल लोनचा वापर लग्न, प्रवास आणि अन्य खर्चांसाठी केला जातो. गोल्ड लोन एकदम गरजेवेळी घेतलं जातं.

कर्ज फेडलं नाही तर गोल्ड लोनमध्ये दागिने जप्त होतात. तर पर्सनल लोनमध्ये काहीच तारण नसतं त्यामुळे क्रेडिट स्कोअर खराब होतो. 

व्याजदर कमी हवा असेल तर गोल्ड लोन आणि काहीही तारण न ठेवता लोन हवं असेल तर पर्सनल लोन योग्य ठरेल. तुमच्या गरजेनुसार तुम्ही काय ते ठरवा.