15 नोव्हेबर 2024

रेशनकार्डवरून तुमचं नाव तर कापलं नाही ना! असं तपासा

Created By: राकेश ठाकुर

भारत सरकारने देशातील नागरिकांसाठी खूप साऱ्या योजना आणल्या आहेत. त्यापैकी एक योजना अन्नधान्य पुरवण्यासंदर्भातील आहे.

अन्नधान्यासाठी सरकार रेशनकार्ड देते. या माध्यमातून लोकं या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

जर तुमचं रेशनकार्ड आधीपासूनच असेल तर हा नियम एकदा समजून घ्या. नाहीतर तुमचं नाव लिस्टमधून कट होण्याची शक्यता आहे.  सरकारने सर्व रेशनकार्डधारकांना ई केवायसी करणं अनिवार्य केलं आहे.

जितके रेशनकार्डधारक त्याने केवायसी करणं आवश्यक आहे. नाही तर रेशनकार्डवरून नाव कमी केलं जाईल

यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2024 ही तारीख निश्चित केली आहे.सरकारने ही तारीख आधीच वाढवली आहे. म्हणजेच 30 डिसेंबरपर्यंत केवायसी केली नाही तर रेशन कार्डवरून नाव कापलं जाईल.

तुम्हाला नॅशनल फूड सिक्युरिटी एक्टच्या अधिकृत वेबसाईटव nfsa.go.in/Default.aspx वर जाऊन स्टेटस चेक करू शकता.

जर तुमचं नाव या यादीतून बाहेर गेलं असेल तर रेशन डिलरकडे जाऊन याबाबत तक्रार कराल आणि पुन्हा नाव समाविष्ट करा.