आपण आपली कार तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. पण असं असलं तरी गाडी आपल्या तब्येतीबाबत काही संकेत देत असते. 

कारच्या इंजिनमध्ये गडबड असल्याचे काही संकेत असतात. त्यामुळे काही बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

कारमधून निघणारा धूर कारच्या स्थितीबाबत सर्वकाही सांगत असते. 

गाडीमध्ये काही गडबड असेल तर कोणत्या रंगाचा धूर काय सांगतो? त्यावर काय करावं हे जाणून घ्या. 

कारमधून वेगवेगळ्या धुरांचा काय अर्थ असतो ते जाणून घ्या.

पांढऱ्या रंगाच्या धुराचा अर्थ कारमधील कूलंट लीक असल्याची माहिती देते. यामुळे इंजिन लवकर गरम होईल आणि सीझ होऊ शकतं. 

काळ्या रंगाचा धूर फ्यूल लिक असल्याचं सांगतो किंवा फ्यूल इंजेक्टरमध्ये गळती असल्याचे संकेत देतो. 

पिस्टन/वॉल्व गाइडमध्ये गडबड आणि इंजिन खराब झाल्याने निळा रंगाचा धूर निघतो. 

जर तुमच्या कारमधून तीन पैकी एका रंगाचा धूर निघत असेल तर लगेच गॅरेजमध्ये गाडी घेऊन जा.