गोपीचंद पडळकरांनी पळून जायला एखादा देश शोधावा, सचिन खरातांची जोरदार टीका
पडळकर तुम्ही आदरणीय शरद पवार साहेब यांचं विसर्जन करायला निघाला पण तुमचं आजपर्यंत किती पक्षात विसर्जन झाले असा टोला त्यांनी लगावला आहे.
पडळकर भारतात महागाई मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तुम्हीच एखादा देश पळून जाण्यासाठी शोधून ठेवा. आता मंत्रिपद न मिळाल्यावर कोणत्या पक्षात विसर्जन होणार तेही शोधा असा टोला सचिन खरात यांनी लगावला आहे. गोपीचंद पडळकर तुम्ही म्हणता आदरणीय शरद पवार साहेब श्रीलंकेप्रमाणे पळून जातील. परंतु शिक्षण असेल तर नीट अभ्यास करा, सत्ताधारी पक्षामुळे श्रीलंकेत महागाई वाढली होती. त्यामुळे सत्तारूढ पक्षाचे नेते पळून गेले होते. आता सत्तारूढ तुम्ही आहात त्यामुळे भारतात महागाई मोठया वाढली आहे. त्यामुळेच तुम्हीच एखादा देश तुम्हीच शोधून ठेवा. पडळकर तुम्ही आदरणीय शरद पवार साहेब यांचं विसर्जन करायला निघाला पण तुमचं आजपर्यंत किती पक्षात विसर्जन झाले असा टोला त्यांनी लगावला आहे.
Published on: Sep 07, 2022 11:31 AM