मुळा मुठा नदीच्या किनारी वसलेलं शहर म्हणजे पुणे. विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे. पुण्यनगरी या नावावरून या शहराचे पुणे हे नामकरण झाले असावे असे मानले जाते. भारतातील आठव्या आणि राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. पुण्याची लोकसंख्या लोकसंख्या 94,26,959 एवढी आहे. जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण दोन टक्के आहे. पुणे शहर, आंबेगाव, खेड, जुन्नर, इंदापूर, भोर, बारामती, मावळ, पुरंदर, मुळशी, हवेली, दौंड, वेल्हे आणि शिरुर आदी 14 तालुके पुण्यात आहेत. कार्ला या बौद्ध लेणीतील शिलालेखावरून या शहराचा इतिहास 2000 वर्षापूर्वीपासूनचा असल्याचं दिसून येतं. 13 व्या ते 17 व्या शतकापर्यंत या शहरावर इस्लामी शासनकर्त्यांचं राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म येथेच शिवनेरीवर झाला. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे शहर आहे. या शहरात पेशव्यांचीही राजवट होती. 19व्या शतकात ब्रिटीशांनी पुण्यावर ताबा मिळविला होता. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात याच शहरात एक करार झाला. पुणे करार म्हणून तो इतिहासात प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, रा. गो. भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले यांनी इथूनच स्वातंत्र्याची आणि समाजसुधारणेची सुरुवात केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच शहरातून भारतातील शैक्षणिक क्रांती घडवून आणली. शास्त्रीय संगीताच्या मैफिली, नाटक, साहित्य, क्रिडा, आध्यात्मिक सोहळे यामुळेही हे शहर प्रसिद्ध आहे. पुणे फिल्म इन्स्टिटयुटमुळे देशभरातील विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. शिवनेरी, सिंहगड, तोरणागड. शनिवारवाडा, पर्वती, आगा खान पॅलेस, दगडूशेठ हलवाई मंदिर, कार्ला-भाजे लेणी यामुळे या शहराची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजी नगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ आदी 21 विधानसभा मतदारसंघ आहेत.
पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा