मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सात बेटांचे शहर म्हणूनही मुंबईची ओळख आहे. जगातील प्रमुख पाच शहरांमध्ये मुंबईची गणना केली जाते. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यात मुंबई विभागली असून मुंबईत अंधरेी, बोरीवली आणि कुर्ला हे तीन तालुके आहेत. तर एकूण 87 गावं आहेत. मुंबईची मुख्य भाषा मराठी हीच आहे. त्यानंतर कोळी व कोकणी, हिंदी आणि इंग्रजी या भाषाही मुंबईत मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. 1942मध्ये महात्मा गांधीजींनी चलेजाव चळवळ मुंबईतूनच सुरू केली होती.
मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व बँक अशा आर्थिक आणि महत्वाच्या संस्था मुंबईतच आहेत. तर प्रत्येकाला भुरळ घालणारी चित्रनगरी अर्थात बॉलिवूडही मुंबईतच आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी सुद्धा मुंबईतच आहे. सिद्धीविनायक, हाजी अली दर्गा, चैत्यभूमी, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी आणि माउंट मेरी चर्च आदी धार्मिक स्थळे मुंबईची वैशिष्ट्ये आहेत. मुंबईत सर्वधर्मीय सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. मात्र, गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आणि दिवाळी मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. मुंबईमध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आदी सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर महापालिकेचे 227 वॉर्ड असून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.
मुंबईतील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा