Aaditya Thackeray | मंत्रिपदासाठी किती काय करावं लागतंय : आदित्य ठाकरे-TV9

| Updated on: Aug 25, 2022 | 12:18 PM

आदित्य ठाकरे यांनी संस्कारावरून पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाना साधला आहे. ते म्हणाले, काय करावे लागते या मंत्री पदासाठी. तर खरोखरच यांच्यावर संस्कार झाले असते तर हे गद्दार झाले नसते.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीकेची झोड उडवली आहे. ते शिंदे गटातील आमदारांना तसेच शिंदे गटात सामिल झालेल्यांना गद्दार म्हणत आहेत. त्यावर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी टीका केली होती. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर संस्कार झालेत की नाही असे विचारले होते. त्यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी संस्कारावरून पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाना साधला आहे. ते म्हणाले, काय करावे लागते या मंत्री पदासाठी. तर खरोखरच यांच्यावर संस्कार झाले असते तर हे गद्दार झाले नसते. त्यांनी गद्दारी केली नसती. पाठीत खंजीर खुपसले नसते. तर वरळीतून राजीनामा द्यावा यावर बोलताना, आदित्य ठाकरे यांनी, थेट समोर या असे आवाहन दिले आहे. तसेच ते म्हणाले, हे मी आधिपासूनच बोलत आहे. मी ही राजीनामा देतो… तुम्ही 40 जणांनी ही द्या…

तारक मेहता का उल्टा चष्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, दयाबेन, मेहता साहब यापैकी एकाची होणार एन्ट्री?
Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तव 15 दिवसांची शुद्धीवर! प्रकृतीत सुधारणा, काय म्हणाले डॉक्टर?