Navneet Rana Vs Shiv Sena: मला तारीख आणि वेळ द्या, मी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसेचं पठन करणार – नवनीत राणा 

| Updated on: Apr 16, 2022 | 1:21 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांनी हनुमान चालिसावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अमरावती: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांनी हनुमान चालिसावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आज अमरावतीच्या हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही पारंपारिक वेशात मंदिरात आले होते. दोघांनीही मंदिरात जमिनीवर बसून हनुमान चालिसाचे पठण केले. हनुमान जयंतीच्या (hanuman jayanti) पार्श्वभूमीवर त्यांनी हे पठण केलं. त्यापूर्वी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसाचं पठण करावं अन्यथा आम्ही मातोश्रीवर येऊन आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून सर्व शिवसैनिक मातोश्रीवर आले आहेत. मात्र, राणा दाम्पत्य अजूनही अमरावतीत असल्याने ते मातोश्रीबाहेर आंदोलन करणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Published on: Apr 16, 2022 12:52 PM
IPL 2022 Purple Cap: उमेश यादवला मागे टाकत नटराजन दुसऱ्या स्थानी, चहलच्या वर्चस्वाला धोका
By Election Result 2022 : पोटनिवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये पिछाडीवर; शॉटगन शत्रुघ्न सिन्हा तर बाबुल सुप्रियो आघाडीवर