Bhiwandiमध्ये कपड्याच्या चिंध्या साठवलेल्या गोदामाला भीषण आग, 3 गोदामं जळून खाक
भिवंडी (Bhiwandi) शहरात भीषण आगी(Fire)ची घटना घडली. कल्याण नाका येथील खोका कंपाऊंड परिसरातील कपड्याच्या चिंध्या साठविलेल्या गोदामाला आग लागली. त्यानंतर भिवंडी अग्निशामक दला(Firebrigade)च्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
भिवंडी (Bhiwandi) शहरात भीषण आगी(Fire)ची घटना घडली. कल्याण नाका येथील खोका कंपाऊंड परिसरातील कपड्याच्या चिंध्या साठविलेल्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या प्रकाराने मोठे नुकसान झाले. आग लागल्यानंतर भिवंडी अग्निशामक दला(Firebrigade)च्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले. परंतु तोपर्यंत या आगीत 3 गोदामे जळून खाक झाली आहेत. तिन्ही गोदामातील कपड्याच्या चिंध्या जळून मोठे नुकसान झाले असून अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन तासात आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कपड्याच्या चिंध्या मात्र जळून खाक झाल्या. त्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. आगीनंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले.