ST Strike |Beedमध्ये ST कामगारांचा संप सुरूच; ग्रामीण भागातील प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय
राज्य परिवहन महामंडळा(ST)चे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप (ST workers strike) पुकारला. अनेक ठिकाणी तो मागे घेण्यात आला. बीड(Beed)मध्ये मात्र एसटी कामगारांचा संप सुरूच आहे.
राज्य परिवहन महामंडळा(ST)चे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप (ST workers strike) पुकारला. अनेक ठिकाणी तो मागे घेण्यात आला. बीड(Beed)मध्ये मात्र एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. त्यांच्या संपाला 98 दिवस होतायेत. संप मागे घेण्यासाठी महामंडळाकडून अनेकवेळा विनवणी करण्यात आली, मात्र कामगार विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहत कामगारांनी संप सुरूच ठेवला आहे. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, असा पवित्रा कामगारांनी घेतलाय. दरम्यान कामगारांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होतेय. दिवाळीच्याही आधीपासून म्हणजेच दिवाळीच्या तोंडावर हा संप सुरू करण्यात आला. कामगारांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या, मात्र विलीनीकरण क्लिष्ट प्रक्रिया असल्याने त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र कामगार आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहेत.