Palghar | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात, तरूण जखमी

| Updated on: Feb 17, 2022 | 3:48 PM

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरची बाइकस्वराला धडक बसलीय. या अपघातात (Accident) आकाश सखाराम नम नामक तरूण गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. अपघातानंतर पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरची बाइकस्वराला धडक बसलीय. या अपघातात (Accident) आकाश सखाराम नम नामक तरूण गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. दापचरी सीमा तपासणी नाक्याजवळ असलेल्या वडवली गावाजवळ ही घटना घडली आहे. अपघातानंतर पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवरून चुकीच्या दिशेने ट्रेलर भरधाव वेगात जात होता. मुंबईच्या दिशेने तो जात असतानाच हा गंभीर स्वरुपाचा अपघात घडला आहे. दरम्यान, अपघात घडल्यानंतर वाहनाच्या लांबच लांब रांगा रागल्या होत्या. व्हिडिओमध्ये अपघाताची तीव्रता दिसून येवू शकतो. विरुद्ध दिशेने आणि तेही अत्यंत वेगात येणाऱ्या वाहनांमुळे चूक नसलेल्यांनाह गंभीर परिणाम भोगावे लागतात, त्याचे हे उदाहरण म्हणाले लागेल.

नाशिकमध्ये आणखी एक कोरोना बळी; रुग्णांमध्ये घट, जाणून घ्या आजचा रिपोर्ट
नाशिक जिल्ह्यातील कैद्यांना मिळतेय मोफत विधी सेवा; राज्यातील एकमेव अभिनव प्रयोग काय?