वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी Amravati जिल्ह्यात युवा स्वाभिमान पक्षाचं टॉवरवर चढून आंदोलन

| Updated on: Feb 02, 2022 | 1:15 PM

शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरण(MSEDCL)कडून तोडली जात आहे. शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरबरा कांदा यासह अन्य पिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आंदोलन (Agitation) करण्यात आले.

ज्या शेतकऱ्यांकडे शेतातील कृषी पंपाचे वीजबिल (Electricity Bill) थकीत आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरण(MSEDCL)कडून तोडली जात आहे. शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरबरा कांदा यासह अन्य पिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आंदोलन (Agitation) करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एका उंच टॉवरवर चढून महावितरण व राज्य सरकार विरोधात विरूगिरी करत हे आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने तत्काळ शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणीदेखील या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. आंदोलन सुरू असताना घटनास्थळी पोलीसदेखील दाखल झाले.

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक; अंजनगाव सुर्जीत उंच टॉवरवर विरूगिरी
Kolhapur | कोल्हापूरच्या सिद्धार्थ शिंदेंची केंद्राने घेतली दखल, दिलेल्या सूचनांचा थेट अर्थसंकल्पात समावेश