Nanded | पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतनिधीचं वाटप
नांदेड (Nanded) जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain) झालेल्या नुकसानीपोटी 136 कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा बँकेला (Bank) प्राप्त झालंय. नांदेडला या आधी 75 टक्के नुकसान भरपाई म्हणून 455 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याचे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप झाले आहे.
नांदेड (Nanded) जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain) झालेल्या नुकसानीपोटी 136 कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा बँकेला (Bank) प्राप्त झालंय. नांदेडला या आधी 75 टक्के नुकसान भरपाई म्हणून 455 कोटी रुपये मंजूर झाले होते. त्याचे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. उर्वरित 25 टक्के अनुदानाच्या बदल्यात आता 136 कोटी रुपये मंजूर झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच ही मदत टाकण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत ही मदत देण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर विविध पथके आणि पंचनामे करण्यात आले. त्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे सरकारने जाहीर केले. त्याप्रमाणे आता बँकेस निधी प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तो टाकला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.