Nashik जिल्हाधिकारी कार्यालयासमोर BJP महिला कार्यकर्त्यांचं Wine विक्रीविरोधात आंदोलन
किराणा दुकानात वाइनच्या (Wine) विक्रीच्या निर्णयाला भाजपाने (BJP) विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये (Nashik) रस्त्यावर वाइन ओतून निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.
किराणा दुकानात वाइनच्या (Wine) विक्रीच्या निर्णयाला भाजपाने (BJP) विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये (Nashik) रस्त्यावर वाइन ओतून निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. काही महिलांनी तर सांडलेल्या वाइनवर नाचत निषेध केला आहे. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर महिला भाजपाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आमदर सीमा हिरेसह भाजपा महिला पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइनच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यातही नियम व अटी आहेत. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपा विरोध करत आहे. सुपर मार्केटमध्ये वाइनची विक्री होऊ देणार नाही, असा पवित्रा भाजपाने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. आज नाशिकमध्ये भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी वाइनच्या विक्रीला विरोध करत आंदोलन केले.