Sindudhurg : मुक्या प्राण्यांना छळणं भोवलं; बैलांची झुंज खेळवल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

| Updated on: Apr 01, 2022 | 5:19 PM

मालवण (Malvan) तळगाव येथे आयोजित केलेल्या बैल झुंजीत (Bull fighting) एका बैलाचा प्राण गेला होता. याप्रकरणी मालवण पोलीस (Police)  स्थानकात प्रमुख 12 व्यक्तींसह अन्य लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मालवण (Malvan) तळगाव येथे आयोजित केलेल्या बैल झुंजीत (Bull fighting) एका बैलाचा प्राण गेला होता. याप्रकरणी मालवण पोलीस (Police)  स्थानकात प्रमुख 12 व्यक्तींसह अन्य लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाची बंदी असतानाही तळगावमध्ये ही बैल झुंज आयोजित केली होती. या बैल झुंजीत जखमी झालेल्या बैलाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. हे सगळे व्हिडिओ वायरल झाल्यानंतर संतापाची लाट उमटू लागली होती. प्युअर अॅनिमल लव्हर (पाल) या संस्थेने मालवण पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर बैल झुंजींना परवानगी नसताना बैल झुंजी लावणे, बैलांना क्रूरतेची वागणूक देऊन बैलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादंवी कलम 429(34), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली. या झुंजीचे कनेक्शन शिवसेनेशी संबंधित असून गुन्हा दाखल झालेले बहुतांशी लोक हे शिवसेनेशी निगडीत असून यात मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांचाही समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
GudhiPadwa | गुढी उत्साहाची, निर्बंधमुक्तीची… राज्यात सोने खरेदीचा उत्साह, वाचा Gold Price Today!
Metro 2A आणि Metro 7 रविवारपासून सेवेत! ईस्ट-वेस्टच्या ट्रॅफिकची चिंता मिटणार