Aurangabad : बबनराव लोणीकरांच्या अडचणी वाढणार, अट्रॉसिटीची तक्रार दाखल

| Updated on: Mar 31, 2022 | 4:13 PM

बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बबनराव लोणीकर यांच्याविरोधात अॅट्रोसिटीची (Atrocity) तक्रार (Complain) दाखल झाली आहे. औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयात अॅट्रोसिटीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बबनराव लोणीकर यांच्याविरोधात अॅट्रोसिटीची (Atrocity) तक्रार (Complain) दाखल झाली आहे. औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयात अॅट्रोसिटीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोन कार्यकर्त्यांनी अट्रासिटीची तक्रार दिली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार ही चौकशी सुरू झाली आहे. एका अभियंत्याला शिवीगाळ करताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते, असा दलित कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यानुसार तक्रारही दाखल झाली आहे.

Published on: Mar 31, 2022 04:12 PM
HSC SSC Result : दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांचा बहिष्कार, निकाल वेळेतच लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न
Aurangabad | औरंगाबाद जिल्ह्यात हर घर नल योजनेला गती, 537 गावांत नळ योजनांना मंजुरी, कसे मिळणार पाणी?