Aurangabadमधील ‘ते’ वादग्रस्त बॅनर फाडलं

| Updated on: Jan 30, 2022 | 5:40 PM

निवडणुकी(Election)साठी उमेदवार बायको पाहिजे, अशा आशयाचं बॅनर रमेश पाटील या विवाहित तरुणानं शहरातील विविध चौकात लावले होते. या बॅनरवरून सकाळपासून शहरात चर्चेला उधाण आले आहे. दुपारी संतप्त भाजपा(BJP)च्या महिला कार्यकर्त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजारपेठेतील बॅनरवर शाई फेक करीत बॅनर (Banner) फाडला.

निवडणुकी(Election)साठी उमेदवार बायको पाहिजे, अशा आशयाचं बॅनर रमेश पाटील या विवाहित तरुणानं शहरातील विविध चौकात लावले होते. या बॅनरवरून सकाळपासून शहरात चर्चेला उधाण आले आहे. दुपारी संतप्त भाजपा(BJP)च्या महिला कार्यकर्त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजारपेठेतील बॅनरवर शाई फेक करीत बॅनर (Banner) फाडला.  बॅनर लावणाऱ्या रमेश पाटील या तरुणांवर त्वरित  कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीनं करण्यात आली. निवडणूक 2022 असं वर लिहिलेलं होतं. त्यानंतर फोटो आणि वादग्रस्त मजकूर त्यावर आढळून आला होता. बायको पाहिजेच्या पुढे जातीची अट नाही, असंही लिहिण्यात आलं होतं. या बॅनरवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. अखेर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी औरंगाबाद शहराच्या ज्या भागात बॅनर लावले होते, त्यावर शाई फेकली तसंच ही बॅनर्सही फाडण्यात आली.

Nashik: शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले, महावितरणच्या टॉवरवरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Nagpur NMC Election | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा; भाजपा उमेदवार निवडीसाठी करणार सर्व्हे