Latur | भाचीच्या लग्न सोहळ्यात एकत्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, पाहा Video

| Updated on: Feb 06, 2022 | 1:39 PM

अत्यंत जवळच्या नात्यातला विवाह असल्यामुळे पंकजा (Panjaka Munde) आणि धनंजय (Dhananjay Munde) यांचे संपूर्ण कुटुंब या विवाह (Wedding) सोहळ्याला उपस्थित होते. ते एकत्रित आल्याचे हे सर्व क्षण कॅमेरात कैद झाले आहेत.

राजकीय कट्टर विरोधक म्हणून मुंडे भावंडांची राज्यात ओळख आहे. मात्र हेच भावंडं एका विवाह समारंभात एकत्र आले आणि मनमुरादपणे गप्पा मारल्या. अत्यंत जवळच्या नात्यातला विवाह असल्यामुळे पंकजा (Panjaka Munde) आणि धनंजय (Dhananjay Munde) यांचे संपूर्ण कुटुंब या विवाह (Wedding) सोहळ्याला उपस्थित होते. दोघांनीही नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिला. एवढेच नाही तर विवाहस्थळी दोघाही बहीण भावांनी एकमेकांच्या हाताला जोरदार टाळी दिली. पंकजा यांनी धनंजय यांच्या लहान मुलीला जवळ घेत प्रेमाने विचारपूस केली. एरव्ही राजकारणात कट्टर शत्रू असलेले मुंडे भावंडं आज हसतमुख होऊन एकत्रित आल्याचे हे सर्व क्षण कॅमेरात कैद झाले आहेत. लातूरमधील एका विवाह प्रसंगातील हे क्षण फक्त टीव्ही 9 मराठीच्या दर्शकांसाठी आम्ही दाखवित आहोत.

वंचित बहुजन आघाडीही ठाणे पालिकेच्या रणांगणात, सर्वाधिक जागांवर महिलांना संधी देणार
Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!