Video | ईव्हीएम मशीन आणि निवडणूक पथकालाच पूराने घेरलं... काय घडलं नाशिकमध्ये?
Image Credit source: tv9 marathi

Video | ईव्हीएम मशीन आणि निवडणूक पथकालाच पूराने घेरलं… काय घडलं नाशिकमध्ये?

| Updated on: Sep 19, 2022 | 12:02 PM

पूराच्या पाण्याशी सामना करत हे पथक गावापर्यंत पोहोचलं. संकटातही आपलं कर्तव्य चोखपणे बजावल्याबद्दल या अधिकाऱ्यांचा सत्कारही वरिष्ठांकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक- राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकांची (Gram Panchayat Election) मतमोजणी आज सुरु आहे. मात्र नाशिक भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदी नाल्यांना (River) पूर (Flood) आलाय. दिंडोरी भागातील एका गावात निवडणूक पथकालाच पूराच्या पाण्याने वेढल्याची घटना घडलीय. ईव्हीएम मशीन हाती घेतलेल्या अधिकाऱ्यांना पूरातून सोडवण्यासाठी गावकरी आणि स्थानिक अधिकारी प्रयत्न करत आहेत. मात्र या घटनेमुळे दिंडोरी भागातील तेरे गावातील मतमोजणीला काही काळ उशीर होण्याची शक्यता आहे. पूराच्या पाण्याशी सामना करत हे पथक गावापर्यंत पोहोचलं. संकटातही आपलं कर्तव्य चोखपणे बजावल्याबद्दल या अधिकाऱ्यांचा सत्कारही वरिष्ठांकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: Sep 19, 2022 11:48 AM