CCTV Footage | Electronic Scooty खरेदीच्या बहाण्यानं चोरी, Jalnaमधील प्रकार

| Updated on: Feb 10, 2022 | 2:07 PM

इलेक्ट्रॉनिक स्कूटी (Scooty) विकत घ्यायची आहे, असा बहाणा करून आलेल्या एका चोरट्याने स्कूटी चोरून नेली. ट्रायल मारतो म्हणत चक्क स्कूटी पाळवल्याचा प्रकार जालन्यात घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

इलेक्ट्रॉनिक स्कूटी (Scooty) विकत घ्यायची आहे, असा बहाणा करून आलेल्या एका चोरट्याने स्कूटी चोरून नेली. ट्रायल मारतो म्हणत चक्क स्कूटी पाळवल्याचा प्रकार जालन्यात घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पळवलेल्या स्कूटीची किंमत 80 हजार रुपये असून या प्रकरणी NRG इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री यांच्याकडून सदर बाजार पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दोघे जण दिसत आहेत. ग्राहक बनून आलेली व्यक्ती स्कूटी बाहेर नेत आहे. दुकानाच्या समोर दोघेजण बोलत असल्याचेही दिसत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने स्कूटी सुरू केली आणि परत फिरकला नाही. यानंतर दुकानदाराकडून संबंधित घटनेविषयीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऐंशी हजाराची वस्ती चोरीला गेल्यासंबंधी आता पोलिसांत धाव घेण्यात आली आहे.

Latur Market: खरिपातील ‘या’ दोन्हीही पिकांचे वाढले दर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा
Hinganghat जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप, एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळल्याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल