Indapurचे आमदार आणि राज्यमंत्री Dattatray Bharne यांचा मटणावर ताव

| Updated on: Feb 18, 2022 | 8:04 PM

राज्यमंत्री तथा सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी गावकऱ्यांसोबत पंगतीत बसून जेवण केले. इंदापूर (Indapur) तालुक्यातील निरवांगी या गावी गुरुवारी सायंकाळी राजकीय कामकाजानंतर जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

राज्यमंत्री तथा सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी गावकऱ्यांसोबत पंगतीत बसून जेवण केले. इंदापूर (Indapur) तालुक्यातील निरवांगी या गावी गुरुवारी सायंकाळी राजकीय कामकाजानंतर जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गावकऱ्यांच्या पंगतीत बसले. जे काम करायचे ते सर्वसामान्य जनतेसाठी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक लोकांसाठी करायचे व हीच जनता नेहमी माझ्या पाठीशी आहे, मी शोबाज नाहीये, माझ्या पाठीशी इनोव्हा, मर्सडीज गाडीतली लोक नसून, जे सर्वसामान्य आहेत, बोलेरो व फटफटीवर (दुचाकी) असतात हीच जनता कायम माझ्या पाठीशी आहे”, असे नेहमीच भरणे भाषणात सांगून माझे पाय कायम जमिनीवरच असतात, हे ते नेहमीच दाखवून देत असतात. त्याचीच गुरुवारी प्रचितीच जणू आली. या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक आदींची उपस्थिती होती.
Published on: Feb 18, 2022 04:17 PM