Rohit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं; रोहित पवार यांची मागणी

Rohit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं; रोहित पवार यांची मागणी

| Updated on: Mar 07, 2025 | 10:26 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राची सामान्य जनता जात, धर्म, राजकारण विसरून एका युवा सरपंचाच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून लढा देत आहे. त्याचा परिणाम म्हणूनच आज धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पण हे इथेच थांबत नाही. यात धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं पाहिजे. कारण भाजपच्याच एका आमदाराने सांगितलं होतं की, खंडणीची सगळी मुळं तिथूनच सुरू होतात. यक बैठका धनंजय मुंडे यांच्या घरी झाल्या होत्या. त्यामुळे सुरुवात तिथे झाली असेल तर धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Published on: Mar 04, 2025 02:21 PM
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर, आरोपीचा हत्येच्या वेळी ग्रुपवर व्हिडिओ कॉल
राजीनामा देताच संभाजी भिंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला म्हणाले….