Virar | Gujrati धार्मिक कार्यक्रमात पैशांची उधळण, Video Viral
गुजराती गायिकेवर लाखो रुपयांच्या नोटा (Notes thrown on Singer) भिरकावल्याचा दावा केला जात आहे. विरारमध्ये (Virar) धार्मिक कार्यक्रमात पैशांचा पाऊस पाडल्याचं चित्र पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
गुजराती समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध गुजराती गायिकेवर लाखो रुपयांच्या नोटा (Notes thrown on Singer) भिरकावल्याचा दावा केला जात आहे. विरारमध्ये (Virar) धार्मिक कार्यक्रमात पैशांचा पाऊस पाडल्याचं चित्र पाहायला मिळालं. गायिका गाणं गात असताना ताल धरत तिच्या अंगावर शेकडो जणांनी नोटांचे बंडलच्या बंडल उधळल्याची माहिती आहे. नोटांचे बंडल उधळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. स्वयंचैतन्य शक्तीपीठ आनंद धाम गोशाळाच्या माध्यमातून विरार पूर्वेकडील रायपाडा परिसरातील गोशाळेत हा कार्यक्रम झाला होता. 19 फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्री 9:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडला असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे विरार पोलिसांना याची थोडीसुद्धा कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.