Arvind Sawant | ‘PM Narendra Modi यांना महाविकास आघाडीत राजकारण करायचंय’

| Updated on: Feb 08, 2022 | 4:06 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदीं(PM Narendra Modi)कडून आज राज्यसभेत शरद पवारां(Sharad Pawar)चे कौतुक झाले. शरद पवार यांच्याकडून सगळ्यांनीच प्रेरित झालं पाहिजे. पण पंतप्रधान आदराने बोलले की नाही हा मोठा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं(PM Narendra Modi)कडून आज राज्यसभेत शरद पवारां(Sharad Pawar)चे कौतुक झाले. शरद पवार यांच्याकडून सगळ्यांनीच प्रेरित झालं पाहिजे. पण पंतप्रधान आदराने बोलले की नाही हा मोठा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिली आहे. कारण पंतप्रधानांना महाविकासआघाडीबाबत राजकारण करायचे आहे. कोरोनाकाळात सर्वात जास्त कौतुक आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले. मात्र मोदी याविषयी काहीही बोलले नाहीत. पंतप्रधान मोदी यांचे कालचे भाषण भाजपाचे नेते म्हणून होते. पंतप्रधान म्हणून नव्हते, अशी टीकाही सावंत यांनी केली. आता मुंबई महापालिका यांसह इतर निवडणुका त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. लोकांना मूळ मुद्द्यांपासून दूर नेऊन भ्रम निर्माण करायचा आहे, असा टोला सावंत यांनी लगावला.

Pune Crime : पुण्यात येरवडा कारागृहात पोक्सो गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
काय सांगता ? भारतामधून इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची होणार निर्यात, ‘मेक इन इंडिया’लाही मिळणार चालना..!