Pune Fire Update | पुणे मुळशी आगप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

| Updated on: Jun 08, 2021 | 7:17 PM

आगीला कंपनी मालकच जबाबदार असल्याचं सांगत एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ असलेल्या रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्याचं सांगत एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर या दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आलं. या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केलीय. त्यानंतर कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्याते पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं. रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांमध्ये महिला कामगार अधिक आहेत.

Breaking : उरवडे आग दुर्घटनेस कंपनी मालक जबाबदार, पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
फी मागणी करत विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा, युक्रांदची मागणी