Kirit Somaiya गेल्यानंतर कोर्लई ग्रामपंचायतीचं Shivsena कार्यकर्त्यांकडून शुद्धीकरण

| Updated on: Feb 18, 2022 | 4:03 PM

भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit somaiya) आपल्या लवाजम्यासह आज रायगडातल्या कोर्लईत पोहोचले. यावेळी भाजपाचे (Bjp) कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. सोमैया पंचायत कार्यालयातून गेल्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केले.

भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit somaiya) आपल्या लवाजम्यासह आज रायगडातल्या कोर्लईत पोहोचले. यावेळी भाजपाचे (Bjp) कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. बाइकवर बसून शेकडो कार्यकर्ते सोमैयांसोबत आले होते. त्यांच्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते असल्याने शिवसैनिकांनीही  (Shivsainik) कोर्लईच्या ग्रामपंचायतीसमोर तुफान गर्दी केली. शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याने कोर्लईत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सोमैया येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सोमैया पंचायत कार्यालयाच्या बाहेर येताच शिवसैनिकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी केली. पुन्हा शिवसैनिकांनी सोमैयांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण सोमैया तत्काळ गाडीत बसले आणि वायुवेगाने त्यांची गाडी रेवदंडा पोलीस ठाण्याच्या दिशेने गेली. सोमैया पंचायत कार्यालयातून गेल्यानंतर शिवसैनिकांनी सोमैया आले त्या जागेवर गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केले.

शेतीमालाच्या आधारभूत किंमतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ, काय आहे केंद्राचा अहवाल?
Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव, पहा काय आहे नियमावली?